abhijeet bahadure  sakal
महाराष्ट्र बातम्या

Success Story : आठ वर्ष नोकरी केल्यावर कॉर्पोरेट विश्वाला रामराम, छंदाला व्यवसायाची जोड देणारा नागपूरकर

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

Nagpur News: समाजाकडून प्रोत्साहन मिळाले आणि कौतुक झाल्यास माणसात आपसूकच ऊर्जा संचारते. सकारात्मक कार्य करायचे झाल्यास याच ऊर्जेमुळे माणसाची प्रगती होते. कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नसताना चित्रकलेत आपले विश्व निर्माण करणारे अभिजित बहादूरे यांच्याकडे आपल्याला याचेच एक उदाहरण म्हणून पाहता येईल.

लहानपणी घरच्या भिंतीवर लागलेले चित्र न्याहाळत अभिजित यांचा चित्र काढण्याचा सराव सुरू झाला. पुढे वृत्तपत्रात आलेले चित्र देखील त्यांनी कागदावर उतरविण्यास सुरवात केली. त्यांच्या याच छंदाचे कुटुंबीय आणि परिचितांकडून कौतुक होऊ लागले.

प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्या बसोली समूहात १९९४ साली अभिजित सहभागी झाले आणि त्यांच्या चित्रांचे हळू हळू रुपडे पालटले. आप्तांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी विविध चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेणे सुरू केले. हीच चित्रे आपल्या परिचिताना ते भेट देत असत.

चित्रकलेतील या कौशल्याप्रमाणे अभ्यासात देखील ते तितकेच हुशार. २००६ मध्ये त्यांनी मेकॅनिकल अभियंता म्हणून पदवी प्राप्त केली. त्या पाठोपाठ एमबीए आणि वैयक्तिक व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इंडस्ट्रियल मार्केटिंगमध्ये कॉर्पोरेट नोकरी देखील अभिजीतने मिळवली. अभियंता म्हणून आयुष्यातील आठ वर्षे कॉर्पोरेट जगताला समर्पित केल्यानंतर अभिजित यांना आपले खरे आवाहन कलेच्या जगात असल्याचे लक्षात आले.

कॉर्पोरेट विश्वात जीवन स्थिरसावर झाले होते. मात्र, अभिजित यांच्यातील चित्रकाराची होणारी घुसमट, चित्रकलेविषयी असलेली तळमळ लक्ष्यात घेत वॉटर कलरच्या रंगीबेरंगी जगाचा प्रवास २०१८ मध्ये त्यांनी व्यवसाय म्हणून निवडला. आज कार्यशाळेच्या माध्यमातून चित्रकलेत पदार्पण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ते धडे देत आहेत. वाटचालीत अनेक आव्हाने असले तरीही हा छंदातून सुरू झालेला हा प्रवास आनंददायी असल्याचे अभिजित सांगतात.

चित्रांमध्ये समाजातील दाहकता

अभिजित बहादूरे यांनी केवळ छंद म्हणून चित्र काढणे सुरू केले. आज त्यांच्या चित्रांना सामाजिक रूप प्राप्त झाले आहे. २०१९ मध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे दाहक वास्तव त्यांनी चित्रात उतरविले. या चित्रांचे पुढे प्रदर्शन देखील भरविण्यात आले. ऑनलाइन प्रदर्शनाच्या माध्यमातून जपानच्या एका प्रदर्शनात देखील ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT