Minister Abdul Sattar sakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ?; 'त्या' प्रकरणावरून कोर्टाने पाठवली नोटीस

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत बोलल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली होती. अशातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खडे बोल सुनावत नोटीस देखील पाठवली आहे.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल मंत्री होते. याचवेळी अब्दुल सत्तार यांनी वाशिम मधील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी याबाबतची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. याबाबत अब्दुल सत्तार यांना नोटिस देण्यात आली आहे.

याबाबत, नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. यासंबधी हायकोर्टाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. तर जिल्हा कोर्टाचा आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतला आहे. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या जीआरची पायमल्ली अब्दुल सत्तारांच्या निर्णयामुळे झाली आहे, असे म्हणत कोर्टाने अब्दुल सत्तार यांना नोटीस पाठवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT