Nagpur Floods Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Floods : आतापर्यंत तीन मृत्यू! नुकसानग्रस्तांना १० हजारांची मदत; फडणवीसांची घोषणा

रवींद्र देशमुख

नागपूर - Nagpur Floods: नागपूर मध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. कित्येक गुरं पुरात वाहुन गेली आहे. कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पुरात तीन मृत्यू झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. अतिशय कमी वेळात १०९ मिमी पाऊस पडला. ९० टक्के पाऊस दोन तासात पडला. त्यामुळे अंबाझरी ओव्हरफ्लो झाला. त्यातूनच नाग नदी, पिवळी नदीत पूरस्थिती निर्माण झाली.

ते पुढं म्हणाले की, आतापर्यंत दोन मृत्यू झाले असून पुन्हा एक बॉ़डी सापडली आहे. १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. शिवाय १० हजार लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. काही लोकांना बाहेर शिफ्ट करावं लागलं आहे. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे करून तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देणार आहोत. त्यासोबत महापालिका गाळ काढण्यास कार्यवाही करणार असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.

दरम्यान दुकानांचे जे नुकसान झाले त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत करणार आहोत. तर छोट्या ठेल्यांना १० हजारांची मदत देणार आहोत. काही ठिकाणी पुल नव्याने बांधणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: आज कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT