म्युकर मायकोसिस e sakal
महाराष्ट्र बातम्या

आता नागपुरातील 'ही' कंपनी बनविणार म्युकर मायकोसिसवरील औषध

भाग्यश्री राऊत

नागपूर : सध्या म्युकर मायकोसिसने (mucor micosys) डोकं वर काढलं आहे. आजच केंद्र सरकारने देखील म्युकर मायकोसिसच्या वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यासाठी आता नागपुरातील युनिज्युल्स लाइफ सासन्सेस (unijyules life sciences) या कंपनीलाही अन्न व औषध प्रशासनाकडून म्युकर मायकोसिसवरील महत्वाचं औषध 'एम्फोटेरेसीन-बी' (amphotericin b) हे इंजेक्शन तयार करण्यात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता म्युकर मायकोसिसवरील औषधांचा तुटवडा लवकरच दूर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (nagpur hingana midc based company will produce injection on mucormicosys)

वर्ध्याच्या एमआयडीसीमधील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिविर आणि एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन बनवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, अजूनही एम्फोटेरेसीन बी या औषधाचे उत्पादन सुरू झाले नाही. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. औषधांच्या दुकानांमध्ये देखील हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पोस्ट कोविडनंतर म्युकर मायकोसिसचे अनेक रुग्ण वाढले असून काही रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगणा एमआयडीसीमधील युनिज्युल्स लाइफ सायन्सेस या कंपनीला म्युकर मायकोसिसवरील औषध बनविण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप उत्पादन सुरू झाले नसून हे औषध तयार होण्यास जवळपास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT