Tiger 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील जंगलात अडीचशे वाघ!

सकाळवृत्तसेवा

नागपूर - देशात व्याघ्रगणनेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, महाराष्ट्रातील जंगलात सुमारे 235 ते अडीचशे वाघ असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ही आनंदाची बाब असली तरी दिवसेंदिवस जगंलाची गुणवत्ता कमी होत चालल्याने भविष्यात वाघांसाठी ही धोक्‍याची घंटा समजली जात आहे. याच कारणामुळे मानव व वन्यजिवांमधील संघर्ष वाढणार असल्याचा निष्कर्षसुद्धा तज्ज्ञांनी काढला आहे.

डिसेंबर 2017 पासून राज्यात व्याघ्रगणनेला सुरवात झालेली आहे. त्याची आकडेवारी देशपातळीवर मार्च 2019 पर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने राज्यात सर्वच व्याघ्र प्रकल्पांसह इतरही गणना झालेल्या भूभागातील वाघ आणि वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे, खुणा आणि विष्ठांचे नमुने, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र आणि इतरही माहिती तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयांनी संबंधितांना पाठविलेल्या आहेत. यंदा जळगावमध्येही वाघांचे अस्तित्व दिसल्याची माहिती पुढे आलेली आहे.

गणनेमध्ये देशातील वाघांची संख्या 2 हजार 500 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात वाघांची संख्या वाढलेली दिसली, तरी यामध्ये वाघ आढळणारी सर्वच राज्ये चांगले काम करत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढली आहे.

वर्ष - देशातील - राज्यातील संख्या
2010 - 1700 - 169
2014- 2226 - 190
2018- 2500 - 250 अंदाजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Thane Rain Traffic : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा जोर; पुढील २४ तास महत्त्वाचे, वाहतूक कोंडीची काय आहे स्थिती?

Ben Stokes Century: निवृत्तीनंतरही बेन स्टोक्सचा जलवा; १२ वर्षानंतर संघात परतला अन् पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांची महाराष्ट्रातील नेते भेट घेणार

MHADA Pune: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाच्या ताथवडे प्रकल्पातील ६३४ फ्लॅट्सची दुसरी सोडत जाहीर

Vidarbha Rain: विदर्भात पावसाला सुरवात, बळीराजा सुखावला; पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा, अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना वेग

SCROLL FOR NEXT