

Mumbai Thane Rain Traffic
esakal
IMD Weather Forecast : मुंबई आणि उपनगरांत बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून, अनेक भागांत अवघ्या तीन तासांत २० ते ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उत्तर उपनगरातील बोरिवली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर, मुलुंड, ठाणे आदी भागांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दिवसभर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा तसेच दक्षिण गुजरातच्या काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.