devndra fadnvis  sakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur : तर अनेक नेते अडचणीत येतील ‘एल्विश’वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

एका रिॲलिटी शोचा विजेता एल्विश यादव गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आरतीसाठी उपस्थित होता.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - एल्विश यादव हा रिॲलिटी शोचा विजेता होता त्यावेळी तो सेलिब्रिटी होता त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे गणशोत्सवादरम्यान आरतीसाठी आला. आता त्याच्यावर आरोप झाला. अशी प्रकरणे आम्ही बाहेर काढली तर अनेक नेते अडचणीत येतील,’’ असा इशारा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

एका रिॲलिटी शोचा विजेता एल्विश यादव गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आरतीसाठी उपस्थित होता. यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे. या टीकेला फडणवीस यांनी आज नागपुरात उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ सध्या काही झाले की मुख्यमंत्र्यांवर वैफल्यग्रस्त असलेले ठाकरे गटाचे लोक आरोप किंवा टीका करतात.

गणेश उत्सवात मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात. रिॲलिटी शो जिंकल्याने त्यावेळी एल्विश यादव एक सेलिब्रिटी होता असे अनेक सेलिब्रिटी येऊन जातात. ज्या वेळेस तो आला तेव्हा त्याच्यावर कुठला आरोप नव्हता. आता त्याच्यावर आरोप आहे. मात्र असेच जर असेल तर कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते? ते बाहेर काढले तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे समोर येतील.’’

एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो त्याला त्यांच्या गटातील एक खासदार घेऊन जातो. तो खासदार स्वत: ड्रग्जचे सेवन करतो. या व्यक्तीला ‘वर्षा’ बंगल्यावर कुणी आमंत्रित केले होते? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याचा काय संबंध आहे? मुख्यमंत्र्यांचे राजकीय कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का? दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबातले किती आमदार ड्रग्जचे सेवन करतात याची माहिती हवी असेल तर मी देईन.

- खा. संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते

विरोधकांना काय कामे राहिली आहेत? आम्ही कामे करतो, विरोधकांना काही काम उरले आहे का? रोज आरोप करणे हेच त्यांचे काम आहे. आम्ही कामातून उत्तर देतो. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प सुरू करत आहोत. तुम्ही ‘इगो’ ठेवून अनेक कामे बंद केली होती. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. रोज सकाळी उठले की त्यांना तेच काम आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

...तर पोलिसांवरही कारवाई

‘‘ ड्रग्जनिर्मिती व विक्रीत सहभागी असलेल्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात छापे टाकण्यात येत आहे. या विरोधातील लढाई ही राष्ट्रीयस्तरावर लढावी लागणार आहे. यात पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी असतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल,’’

असेही फडणवीस म्हणाले. ‘‘ पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांना अर्थ नसतो. जे ललित पाटील प्रकरणात आपण बघितले आहे. कशाप्रकारे त्याला संरक्षण मिळाले आणि कुणी संरक्षण दिले आहे हे नंतर कळले. राजकीय नेत्यांनी अशा बाबतीत कुणावर तथ्यहीन आरोप करू नये,’’ असेही फडणवीस म्हणाले.

रेव्ह पार्ट्या करणारा आणि सापाच्या विषाची नशा पुरविण्याचे काम करणारा एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरात कसा पोहोचला? याचे उत्तर सरकारने द्यावे.मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आरती करण्यासाठी यादवला बोलाविण्यात आले होते त्याला निमंत्रित करण्यापूर्वी त्याच्या कृत्याबद्दल गृह विभागाला माहिती नव्हती का? सध्या राज्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. सरकारच्या मंत्र्यांपर्यंत गुटख्याचा हप्ता जातो

-विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT