https://www.esakal.com/maharashtra/nagpur-mva-vajramuth-sabha-vijay-wadettiwar-on-bjp-devendra-fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

आम्ही राम-राम शब्दांनी धर्म-पथं जोडले अन् यांनी श्रीराम म्हणतं माणसं एकमेकांपासून तोडली; वडेट्टीवार बरसले

संतोष कानडे

नागपूरः नागपूर येथे आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. सुरुवातीला बोलतांना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर चांगलेच आसूड ओढले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, खरा राम आमच्या मनात आहे. सकाळी उठून जात-धर्म-पंथ न पाहाता राम-राम म्हणून माणसं आनंदाने राहात होती. राम-राम या दोन शब्दांनी माणूस माणसाशी जोडला. परंतू यांनी (भाजपने) श्रीराम या शब्दाने माणूस माणसापासून आणि धर्म धर्मापासून वेगळा केला.

ते पुढे म्हणाले की, राम आमच्या हृदयात आहे. त्यांच्या मुखात असलेला राम केवळ मतासाठी आहे. प्रभू रामचंद्राचा वापर मतांसाठी करणाऱ्या नालायकांनो, राम आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही. सध्या उपस्थित असेलेले लोक बजरंगबलीची गदा घेऊन आलेत. भाजपला नक्कीच धडा शिकवतील.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

  • राम आमच्या मनात आहे

  • सकाळी उठून जात धर्म-पंथ न पाहाता राम-राम म्हणून आनंदात माणसं राहात होती

  • राम-राम या शब्दांना धर्म आणि पंथ जोडला, माणूस जोडला

  • मात्र भाजपने श्रीराम या शब्दाने माणूस माणसापासून धर्म-धर्मापासून वेगळा केला

  • राम आमच्या हृदयात आहेत

  • यांच्या मुखात मतासाठी राम आहे

  • प्रभू रामचंद्राचा वापर मतासाठी करणाऱ्या नालायकांनो, प्रभू रामचंद्र आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • हे लोक बजरंगबलीची गदा घेऊन आलेत तुम्हाल धडा शिकवतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT