Rahul Gandhi and Gautam Adani Sakal
महाराष्ट्र बातम्या

Gautam Adani : ..म्हणून अदानी हिंडेनबर्गचं काहीही करु शकले नाहीत; पृथ्वीराज चव्हाण यांनी छेडला मुद्दा

संतोष कानडे

नागपूरः नागपूरमध्ये महाविकास वज्रमूठ सभा सुरु आहे. या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, जयंत पाटील यांची उपस्थिती आहे.

यावेळी बोलतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हिंडेनबर्ग या परदेशी संस्थेने अदानींचं सगळं बाहेर काढलं. अदानी त्याच्यावर मानहानी आणि अब्रूनुकसान दाखल करणार होते. परंतु ते काहीही करु शकले नाहीत. अदानींच्या १३२ कोटींच्या संपत्तीचा ऱ्हास झाला. एक माणूस एवढ्या कमी वेळेत एवढा मोठा कसा होऊ शकतो, असा प्रश्न चव्हाणांनी उपस्थित केला.

पुढे बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलत आहेत. ते शेतकऱ्यांना, बेरोजगारांना दिलेले आश्वासनं पाळत नाहीत. मुळात देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे भाजपला जागा दाखवण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

  • अदानी हिंडेनबर्गचं काहीही करु शकले नाहीत

  • अदानीचे १३२ अब्ज संपत्तीचा ऱ्हास झाला

  • राहुल गांधींनी अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटींचा मुद्दा उपस्थित केला

  • मात्र भाजपकडून त्यावर काहीही उत्तर आलेलं नाही

  • जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत

  • १४ फेब्रुवारी २०१९ला जो भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यावर ते बोलले

  • माजी राज्यपाल मलिक यांना त्यावेळी बोलू दिलं नाही

  • आज पंतप्रधान प्रत्येक गोष्टीत खोटं बोलत आहेत

  • बेरोजगारांना दिलेले, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं पाळली जात नाहीत

  • मुळात या देशात लोकशाही अस्तित्वात राहिल की नाही, हाच प्रश्न आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT