nagpur is second in corona vaccination in maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात लसीकरणाला आला वेग; नागपुरातही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

राजेश प्रायकर

नागपूर : लसीकरणाला मोठा वेग आला असून राज्यात दररोज दोन लाखांवर नागरिक लस घेत आहेत. लसीकरणात टक्केवारीनुसार नागपूर जिल्ह्याने राजधानी मुंबईला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील नागरिक लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद देत असल्याचे आकडेवारीतून अधोरेखित झाले. 

राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या एकूण लसीकरणाबाबतची आकडेवारी स्पष्ट केली आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्याची लोकसंख्या पावणेबारा कोटी आहे. मार्चमध्ये राज्यातील ६० लाख २९ हजार ६४९ नागरिकांनी लस घेतली. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व विविध आजार असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना लस देणे सुरू झाल्यानंतर लसीकरणाला वेग आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना १ मार्चपासून लसीकरण सुरू झाले. महिनाभरात २७ लाख ८२ हजार ५०४ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. ४५ ते ६० वयोगटातील विविध आजाराने ग्रस्त ६ लाख ७१ हजार १४४ नागरिकांनी लस घेतली. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असली तर खऱ्या अर्थाने मार्चपासून लसीकरणाला वेग आला. मार्चमध्ये लसीकरण करणाऱ्यांची एकूण टक्केवारी ५.२ टक्के आहे. 

लसीकरणात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ९४ लाख ३० हजारांवर आहे. मार्चमध्ये येथील ७ लाख ४६ हजार ८०५ नागरिकांनी लस घेतली. यात आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील विविध आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख ५० हजारांवर असून येथील ३ लाख ५९ हजार ९४३ नागरिकांनी लसीकरण केले. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८४ लाखांवर असून येथील ११ लाख २६ हजार ४६७ नागरिकांनी लस घेतली. 

लसीकरणाची टक्केवारी -

  • पुणे ७.९ टक्के 
  • नागपूर ७.५ टक्के 
  • मुंबई ६.१ टक्के 

राज्यात लसीकरण करणारे नागरिक 

  • ६० लाख २९ हजार ६४९ 
  • ५.२ टक्के 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT