Nitin Gadkari Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari : गडकरींना धमकीचे तीन कॉल; दुसऱ्या अन् तिसऱ्या कॉलमध्ये...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल आलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले आहेत. सुरुवातीला दोन कॉल आल्याचं सांगितलं जात होतं. परंतु पोलिसांनी यामध्ये अपडेट्स दिलेले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे जे तीन कॉलपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमध्ये बरोबर एक तासाचं अंतर आहे. गडकरी यांच्या नागपूर कार्यालयामध्ये सकळी ११.२५ वाजता पहिला कॉल आला. त्यानंतर दुसरा कॉल ११.३२ आणि तिसरा कॉल १२.३२ वाजता आला होता.

यासंदर्भात नागपूरचे डीसीपी राहुल मदाने यांनी सांगितलं की, नितीन गडकरींच्या कार्यालयात तीन धमकीचे कॉल आले आहेत. त्याचे डिटेल्स मिळत असून क्राईम ब्रँच सीडीआरवर काम करत आहेत. सध्या गडकरींच्या कार्यक्रमळी सुरक्षा वाढवल्याचं त्यांनी सांगितलं.

नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे फोन आले आहेत. सकाळपासून तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता नागपूर कार्यालयाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT