rohit pawar 
महाराष्ट्र बातम्या

"नामदेव जाधव तोतया"; रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी

नामदेव जाधव नावाची व्यक्ती स्वत:ला राजमाता जिजाऊ यांचे वंशज असल्याचा दावा करत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- नामदेव जाधव नावाची व्यक्ती स्वत:ला राजमाता जिजाऊ यांचे वंशज असल्याचा दावा करत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी रोहित पवारांना याप्रकरणी पत्र लिहिलं आहे.

रोहित पवारांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली आहे. ( namdev jadhav claiming ancestors rajmata jijau ncp leader rohit pawar got letter about investigation)

फेसबुकवर झालेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणालेत की, नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे.

याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. याबाबतचं पत्र त्यांनी दिलं.. . लोकांच्या माहितीसाठी हे पत्र मी शेअर करत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT