Rahul Gandhi and Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi : काँग्रेस 'अलर्ट मोड'वर! शरद पवार-अजित पवार भेटीबाबत राहुल गांधींना दिली माहिती

रवींद्र देशमुख

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या गुप्त भेटीने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. तर इंडिया आघाडीमधील पक्षांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. यावर नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे.

नाना पटोले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीविषयी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच हायकमांड देखील यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही संभ्रमात नसून जनतेत संभ्रम आहे. अजित पवार त्यांचे नातेवाईक आहे. पण गाडीत झोपून जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे हे आघाडीसाठी चिंताजनक आहे.

दरम्यान या संदर्भात उद्धवजी आणि आम्ही चिंता व्यक्त केली आहे. आम्ही संभ्रम निर्माण करत नसल्याचही नाना पटोले यांनी म्हटलं. बारामती मतदार संघाबाबत नाना पटोले म्हणाले की, राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघ आहे. आम्ही सगळ्या ठिकाणच्या नेत्यांकडून अहवाल मागवला आहे. बारामती लोकसभा क्षेत्रात आमचे दोन आमदार आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसचे मतदान असल्याचं पटोले यांनी नमूद केलं.

ऑन पदयात्रा

येत्या ३ सप्टेंबरपासून राहुल गांधी यांची पदयात्रा सुरू होणार असल्याची माहिती पटोले यांनी दिले. त्याचवेळी भाजप केंद्रात आणि राज्यात बसून लूट करत असल्याचा आरोप करताना नाना पटोले यांनी ठाण्यात निर्दोष लोकांचे हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूंवरून सरकारवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT