Nana Patole  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : ''पूर्वी ईडीचं सरकार होतं आता येड्यांचं सरकार'' ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले....

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीच्या पूर्वतायरीसाठी नाना पटोलेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बैठकीनंतर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला.

नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीची पूर्वतयारी सुरु असून आम्ही आयोजक असल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलो होतो. घटकपक्षांना सोबत घेऊन कार्यक्रमाची योग्य तयारी करण्यासंबंधी चर्चा झाली. पूर्ण देशातून सात मुख्यमंत्री आणि व्हीआयपी बैठकीसाठी येणार आहेत.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, जे भाजपसोबत जातील ते संपतील, असं शरद पवारांना सांगायचं आहे. पवारांनी पंतप्रधानांबद्दल केलेलं विधान खरं आहे. पुन्हा येईन, म्हणालेले फडणवीस खाली आले तसंच मोदींचंही होईल. पवार सोबत आहेतच जनतेत संभ्रम नको, अशी आमची भूमिका होती.

''आता भाजपची उलटी गिनती सुरु झाली आहे. पहिल्यांदा ईडीचं सरकार होतं आता येड्याचं सरकार झालं आहे. यांच्यात कसलाही समन्वय नाही, काही ताळमेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. येड्या सरकारमुळे जनता, शेतकरी, बेरोजगार, तरुण, गरीब त्रस्त आहेत.'' असं म्हणत पटोलेंनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT