Nana patole Sameer Wankhede Sakal
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडे पोपट, त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही - नाना पटोले

आर्यन खानला क्लिनचिट मिळाल्यानंतर NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडेंनी तपासात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्यांच्या कारवाई करण्याचे आदेश आहेत.

वैष्णवी कारंजकर

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण विभागाने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर काल आर्यन खानला एनसीबीनेच क्लिनचिट दिली आहे. त्यामुळे त्यावेळी आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निष्काळजीपणे तपास केल्याप्रकरणी कारवाई होणार असल्याची माहिती आहे. याबद्दलच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.

नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्य, हनुमान चालिसा, प्रियंका गांधींची राज्यसभेची उमेदवारी अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणाबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, "काँग्रेसने या आधीही आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरू आहे. समीर वानखेडे हा केंद्रीय यंत्रणांचा पोपट आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्या पुढेही कधी त्याच्यावर कारवाई होणार नाही.

धर्म हा आस्थेचा विषय - पटोले

हनुमान चालिसेवरून राज्यात चाललेल्या वादावर नाना पटोले म्हणतात, मी घरून हनुमान चालिसा वाचूनच निघतो. ही माझी आस्था आहे. आमचा धर्म आम्हाला हे शिकवतो. आमच्याकडे श्रावणातल्या शनिवारी मोठं हनुमान चालिसा होतं. त्याची जाहीरात कधी केली नाही मी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT