Devendra Fadnavis and Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

Savarkar Row : सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन का मिळायची'? नाना पटोलेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा - मागील चार ते पाच दिवसांपासून विनायक सावरकर यांच्याबाबतचा वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांकडून राहुल गांधी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. त्याला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Nana Patole news in Marathi)

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांनी सावरकरांना ब्रिटिशांकडून ६० रुपये पेन्शन का मिळत होते, हे आधी स्पष्ट करावे. या आठवड्याच्या सुरुवातीला 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली आणि भीतीपोटी त्यांनी इंग्रजांना दयेचा अर्ज लिहिला, असा दावा राहुल यांनी केला होता.

दरम्यान आपण सावरकर यांच्याविषयी जे काही बोललो ते पुराव्यानिशी बोललो. सावरकर यांच्याविषयी भाजपला जे वाटते ते म्हणणे त्यांनी मांडावे. त्याला आमचा विरोध नाही. संविधानाने सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. आमचा मार्ग अहिंसेचा आहे. आम्हाला कोणाला दबावात ठेवायचे नाही. ‘भारत जोडो’ यात्रेचा उद्देशच द्वेषाच्या विरोधात आहे,’’ असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

Pune Graduate Constituency: विजय निश्चित, मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ; महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव देशमुख यांचा दावा

Marathi News Live Updates: सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींवरील महिला पत्रकाराच्या आरोपांप्रकरणी २६ किंवा २७ ऑक्टोबरला सुनावणी

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

SCROLL FOR NEXT