political
political esakal
महाराष्ट्र

'उकेंवरील कारवाई म्हणजे कॉंग्रेस अन् नाना पटोलेंच्या बदनामीसाठीचं षडयंत्र'

सकाळ डिजिटल टीम

उके माझे वकिल म्हणून त्यांच्यावर कारवाई होते का - नाना पटोले

नाना पटोले यांचे वकिल उके यांच्यावर ईडी (ED) करावाई केली आहे. सहा तासांच्या चौकशीनंतर सतीश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने ताब्यात घेतल आहे. यानंतर या विषयावर आता प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय तपास यंत्राणाच्या मदतीने कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. मंत्री नितीन गडकरींच्या विरोधाकतील पीटिशनमध्ये उके हे माझे वकिल आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणातही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे सतीश उके (Satish Uke) यांच्यावर कारवाई करत कॉंग्रेस आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या बदनामीसाठी हे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. आज ते नागपुरात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, संबंधित वकिल एखादी केस लढतात याचा असा अर्थ काढला जात असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काँग्रेसला राज्यात ओबीसी आणि अन्य मागास व्यक्तींचा पाठिंबा असल्याचं विरोधकांच्या लक्षात येत आहे, या गटांचा सहभाग वाढत असल्याने सुडबुद्धीने ही कारवाई सुरु आहे. उके माझे वकिल म्हणून त्यांच्यावर कारवाई होते का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगावं हा नंतरचा प्रश्न आहे. वकिलांवर कारवाई करुन कॉंग्रसेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उकेंच्या वडिलांनी आरोप केले तो चौकशीचा भाग आहे. जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता किंवा नागपूर ईडीला माहिती न देता कारवाई केली जाते. याचा अर्थ एक मोठं षडयंत्र असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Swati Maliwal: "होय, स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाले, केजरीवाल कारवाई करतील," 'आप'ने स्वीकारले आरोप

KL Rahul: जो बुंद से गई वो... प्रेक्षकांसमोर झापल्यानंतर राहुलबरोबर संजीव गोयंकांचे डिनर कोणालाच पचेना

CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'या' निर्णयाचा ठाणे-पालघरमध्ये होणार महायुतीला फायदा!

Marathi News Live Update: महायुतीच्या प्रचारासाठी PM मोदींचा उद्या मुंबईत मोठा 'रोड शो'

SCROLL FOR NEXT