Nana Patole sakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : महायुती सरकारमुळे महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर : पटोले

‘महायुती सरकारने कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला आहे. राज्यावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. ‘एमएमआरडीए’सारखा नफ्यात असलेला विभाग आता तोट्यात आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘‘महायुती सरकारने कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला आहे. राज्यावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. ‘एमएमआरडीए’सारखा नफ्यात असलेला विभाग आता तोट्यात आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही तोट्यात कसा? पूर्ण राज्यच लिलावात काढण्यासारखी परिस्थिती सरकारने करून ठेवली आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र व उत्तर प्रदेशची तुलना केली तर उत्तर प्रदेश सरकारही असेच कर्ज काढून रस्ते बांधणीचे प्रकल्प करत आहे. या दोन्ही राज्यांचे रस्ते प्रकल्पाचे अंदाजपत्रक पाहिले तर महाराष्ट्रातील अंदाजपत्रक ४० टक्क्याने वाढीव आहे.

कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. अटल सेतूला भेगा पडल्या आहेत हे सर्वांनी पाहिले आहे.’’ कर्नाटकातील पूर्वीचे भाजप सरकार ४० टक्के कमिशनवाले होते तर महाराष्ट्रातील युती सरकार ६० टक्के कमिशनवाले आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे. ‘‘तेलंगणप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी आहे. हे अधिवेशन महायुती सरकारचे निरोपाचे अधिवेशन असून जनतेला हिशोब देण्याची वेळ आहे, तो हिशोब द्यावा लागेल,’’ असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी; भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये रास्ता रोको, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर

Dhamangaon Farmer Case: संसाराचा गाडा हाकणारा आधारवड कोलमडला; ५२ वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून जीवन संपवलं

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Marathi News Live Updates : मोदी सरकारच्या १२ वर्षात मृत्यू स्वस्त झाला; संजय राऊत यांचा घणाघात

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT