Nana Patole Devendra Fadnavis Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: "पटोले लवकरच गुवाहाटीत! त्यांना महिन्याला 1 खोका मिळतो"; काँग्रेस नेत्याच्याच आरोपामुळं खळबळ

CM शिंदेंकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना महिन्याला 1 खोका मिळतो असा आरोपही करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. पटोले लवकरच गुवाहाटीला असतील त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, या त्यांच्या विधानामुळं खळबळ उडाली आहे. (Nana Patole will be in Guwahati soon he gets 1 crore per month accusation by Ashish Deshmukh)

वारंवार पक्षाच्या नेत्यांवर आरोप केल्यामुळं आशिष देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. याबाबतचा अहवाल काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडं पाठवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू मांडली आहे.

देशमुख म्हणाले, "माझी विधानं ही पक्षविरोधी वक्तव्ये म्हणता येणार नाहीत, मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामाबाबत सर्व माहिती मी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे अडीच-तीन महिन्यांपूर्वी कानावर घातली आहे. पण ही बाब त्यांनी तक्रारीच्या स्वरुपात घेतली की काय? मला माहिती नाही"

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

पटोले १६ एप्रिलला गुवाहाटीत असतील

प्रदेशाध्यक्ष माझ्याविरोधात तक्रार करत असतील तर ही कारवाई चुकीची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मविआच्या सभेत नाना पटोलो हजर नव्हते कारण ते आजारी नव्हते हे त्यांनीच स्पष्ट केलं आहे. पण ते सूरच्या मार्गावर होते अशी माहिती मला मिळाली आहे. सूरतच्या मार्गावर कोण असतं? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. यानंतर आता १६ एप्रिल रोजी पटोले गुवाहाटीत असतील, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला १ खोका मिळतो, असा गंभीर आरोपही यावेळी देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT