Phaltan Video Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nanaware Sucide Case: ननावरे दांपत्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांचं अटकसत्र सुरु, ६ ते ७ जणांना ठोकल्या बेड्या

उल्हासनगरमधील ननावरे दांपत्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

उल्हासनगरमधील ननावरे दांपत्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरु केलं आहे. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह आणखी २ ते ३ जणांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे.

फलटणमधील नंदकुमार ननावरे आणि त्याचा पत्नीचा आत्महत्या प्रकरणात पोलिस तपासाला वेग मिळत नसल्याने भावाने स्वतःच बोट छाटून ते गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग भेट करणार असल्याचे सांगत डाव्या हाताचे एक बोट कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उल्हासनगर मध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केले आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT