Crime News 
महाराष्ट्र बातम्या

Video Viral : नांदेडमध्ये पोलिसांची युवकांना अर्धनग्न करून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात पोलिसांच्या अत्याचाराचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये इस्लापूर पोलिसांचे एपीआय रघुनाथ शेवाळे चार तरुणांना अर्धनग्न अवस्थेत पट्ट्याने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. (Nanded crime News in Marathi)

विश्वहिंदू परिषदेच्या म्हणण्यानुसार, पीडित तरुण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा दोष म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी त्यांनी परिसरात गुरे घेऊन जाणारा ट्रक पकडला होता.

मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी किरण बिचेवार यांनी इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या विरोधात गृहमंत्री, पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. किरणा यांच्यानुसार गोरक्षकांनी कत्तलखान्यात घेऊन जाणारे वाहन अडवले होते. तसेच वाहनातील तीन गोवंशांना मुक्त केल. किनवट तालुक्यात ही घटना घडली होती.

इस्लापूर पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याने कसायांविरुद्ध गुन्हा दाखल करणे भाग पडले. यावरून संतप्त झालेल्या इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांनी गोरक्षकांना ताब्यात घेऊन भांडणाचे कारण सांगून सर्वसामान्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिग अलर्ट! या तारखेपासून सुरू होणार Flipkart Big Billion Days सेल; iPhone वर मोठ्या डिस्काउंटची शक्यता

Chief Sports Executive Officer : आदिती स्‍वामी बनली मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Kolhapur 10 Km Flyover : तावडे हॉटेल ते गगनबावडा रस्‍त्‍यावर 13 हेक्टर जमिनीचे होणार संपादन, 2000 कोटी खर्च होणार; केंद्र सरकारला 15 दिवसांत उड्डाणपुलाचा प्रस्ताव!

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

बापरे! पूनम धिल्लो अन् पद्मिनी कोल्हापुरेंविरोधात अभिनेत्रीची पोलीस तक्रार; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT