कुपोषण
कुपोषण e sakal
महाराष्ट्र

कुपोषित बालकांसाठी राज्यात नंदूरबार पॅटर्न, यशोमती ठाकुरांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण (malnutrition) वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न (nandurbar pattern of malnutrition) राज्यभर राबवण्यास सुरुवात केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या बालकांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या शोधमोहिमेत आढळून आलेल्या सॅम (अतितीव्र कुपोषित गट) आणि मॅम (तीव्र कुपोषित गट) बालकांवर योग्य उपचार करण्यात येणार आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी कुपोषणमुक्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कुपोषणाच्या समस्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवक यांचा समावेश असणार आहे.

आरोग्य विभाग व प्रमाणित उपकरणांच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच कुपोषण आणि मातांचे समुपदेशन करण्यासाठी ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य तसेच महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी आणि बांधणी करण्यात येणार आहे, याचबरोबर इतर दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना त्यांना सुव्यवस्थित पद्धतीने संदर्भसेवा मिळवून देण्याचाही या मोहिमेचा उद्देश आहे.

० ते ६ वर्षे वयोगटातील बालक, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी, लसीकरण पूर्ण करण्याचेही उद्दिष्ट या पथकांना देण्यात आलेले आहे. या मोहिमेद्वारे मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात विभागाला यश येईल.
-अ‍ॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT