Narayan Rane Sakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : बाळासाहेब सावरकर यांना का मानत होते याचा बालिश आदित्यला गंध नाही

आदित्य ठाकरे यांच्यावर मी कधी काय बोलत नाही, ते बालिश आहे, कधी कोणाला भेटायला जातील. सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते?

शर्मिला वाळुंज

आदित्य ठाकरे यांच्यावर मी कधी काय बोलत नाही, ते बालिश आहे, कधी कोणाला भेटायला जातील. सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते?

डोंबिवली - आदित्य ठाकरे यांच्यावर मी कधी काय बोलत नाही, ते बालिश आहे, कधी कोणाला भेटायला जातील. सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते? याचा आदित्यला गंध नाही. ना त्याला माहित ना त्याचे वडील उद्धव ठाकरे यांना माहीत. आपले फोटो येतील म्हणून ते भारत जोडो यात्रेत गेले. राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल बोलले याची कोणत्याही प्रकारची चीड त्यांना आलेली नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

डोंबिवली मध्ये एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे सपत्नीक शुक्रवारी डोंबिवली मध्ये आले होते. यावेळी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. शाहू सावंत आमच्या जवळचे होते, त्यांच्या मुलाने रुग्णालय सुरू केल असून त्याच्या उद्घाटन साठी येथे आलो असल्याचे प्रथम मंत्री राणे यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रा सुरू असून राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले आहे, याविषयी बोलताना राणे म्हणाले, एवढे वर्ष देशात काँग्रेस सत्तेत असल्यानंतर आता त्याला भारत जोडो करावसं वाटतं. हे करून यातायात स्वतःची करून घेत आहे. याच्या मागे किती लोक सामील आहेत. महाराष्ट्रात आले तरी नवीन लोकं त्यांच्या सामील होत नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या सर्व पक्षांची मिळून भारत जोडो यात्रा सुरू आहे, पण यात्रेत ते सामील नाहीत. या तीन पक्षांची मन जुळली नाहीत, सत्तेसाठी ते फक्त एकत्र आलेले आहे आणि हे चित्र दिसुन आलं आहे. यामध्ये त्यांना फारसा यश मिळणार नाही. पंतप्रधान मोदी हे विधायक कार्य करत असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

माझ्या शिफारशीमुळे नीलम गोऱ्हे सेनेत राहिल्या नसत्या - नारायण राणे

शिवसेनेवर टीका केल्याशिवाय त्यांना प्रमोशन मिळत नाही अशी टीका ठाकरे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शेलार यांच्यासह राणे यांच्यावर केली आहे. यावर नारायण राणे यांनी ताईंनी उलट सांगितलं असे म्हणत ताईंना आठवत का विचारा असा सवाल केला.

माझ्या शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्या नसत्या. शिवसेना सोडून त्या चालल्या होत्या. मी त्यांना थांबवले होते आठवतं का त्यांना विचारा. हे ऐकल्यानंतर त्यांना आठवेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ताईंना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्या नाराज आहेत असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष हा कार्यावर, कामावर आणि विकासावर आज लोकांना आपल्याकडे खेचत आहे. जनमानसांची मने जिंकत आहे ना ते काम आणि कार्याचा जीवावर अशी आठवण त्यांनी शिवसेनेला करून दिली.

पहिले गपचूप बदले घेतले जायचे - राणे

बदल्याची भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा ऐकली असे विधान राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे असा प्रश्न विचारताच जाऊ दे त्यांची नाव नका घेऊ असे प्रथम वक्तव्य केले. त्यानंतर पहिले बदले घेतले जायचे पण दाखवले किंवा सांगितले जायचे नाहीत. गपचूप बदले घेतले जायचे. त्यांना नाव पाहीजे तर सांगा मी जाहीर करतो असे कित्येक बळी आत्तापर्यंत गेले आहेत असे राणे म्हणाले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा चौपदरी रस्त्याचे काम राखडल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत असून तो रस्ता केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी संगीतले की, या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचा कंत्राटदार पळून गेल्याने काम थांबले होते. पण आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली असून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्य तत्पर मंत्री असल्याने या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT