Narayan Rane sakal media
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? जमीनी प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश

ठाण्यातील एसीबी विभागाने या प्रकरणाच्या खुल्या चौकशीचे आदेश दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांचे घोटाळे उघडणारी प्रकरणे पहायला मिळत आहेत. दावे-प्रतिदावे करत घोटाळा लवकरच समोर आणले जातील असे इशारे दिले जात आहेत. या सगळ्यात आता यात एक वेगळी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे (Narayan Rane) राज्याचे महसूलमंत्री असताना महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर असणाऱ्या प्रीमियर कंपनीवर १८६ कोटींचा बोजा असताना त्यांनी यात भ्रष्टाचार केला असल्याचा माहिती समोर येत आहे. ही जमीन विकण्यासंदर्भात राणे यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

मंत्री राणे यांनी महाराष्ट्र शासनाची एका प्रीमियर कंपनीची ८६ एकरची जमीन अवघ्या १२ करोड रुपयांना ‘अनंत डेव्हलपर्स बिल्डर’ला विकली असल्याची माहिती समोर येत आहे. खोटा जीआर करून त्यांनी ही जमीन विकली असल्याचा आरोप करत आरटीआय तक्रारदार प्रदीप भालेकर यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे. दरम्यान ठाण्यातील एसीबी विभागाने या प्रकरणाच्या खुल्या चौकशीचे आदेश दिले आहे.

या संपूर्ण भ्रष्टाचाराची लोकायुक्त-महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन महसूलमंत्री-नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकारची ही जमीन कवडीमोल भावात विकली आहे. त्यामुळे याप्रकरणी नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सखोल चौकशी व्हावी, त्यांच्या बेहिशोबी संपत्तीला सीज करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यांची खुली चौकशी व्हावी असे आदेश एसीबीने दिले आहेत.

डोंबिवलीमधील शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या जमिनी अनंत डेव्हलपर्स बिल्डरला विकल्या आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची महाराष्ट्रभरात, गोव्यात, लंडनला असलेल्या संपूर्ण संपत्तीची चौकशी करण्याकरता माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य एन्टीकरप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau) आणि लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार याचिका दाखल केल्या आहेत. त्यानुसारच महाराष्ट्र राज्य एन्टीकरप्शन ब्युरो, ठाणे कार्यालयातून खुल्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढे आता यावर काय कारवाई होते हे पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Vardhapan Din: नेस्कोत शिंदेसेनेचा मेळावा! काळे कपडे, काळी पॉवर बँकला 'नो एन्ट्री'; कार्यकर्त्यांना प्रवेशासाठी नवे नियम

NEET-UG री-एग्जामसाठी NTA ची नवी अॅडव्हायजरी! ड्रेस कोड आणि बायोमेट्रिक पडताळणीबाबत महत्त्वाचे निर्देश

Pune Crime : दाऊद टोळीचे नाव घेत जिवे मारण्याची धमकी; गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याला दिली धमकी

ITR Deadline: ITR भरण्याची शेवटची तारीख कधी? डेडलाइन चुकली तर भरावा लागेल 5,000 रुपयांचा दंड

Mumbai Local Megablock: मुंबईकरांचा रविवारी प्रवास आरामदायी होणार! लोकल वेळेनुसारच धावणार, का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT