Aaditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणेंनी केली आदित्य ठाकरेंची उंदराशी तुलना

धनश्री ओतारी

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे-शिवसेना हा संघर्ष काही नवीन नाहीये. दरम्यान, राणे यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेले विधान सध्या चर्चेत आहे आहे. राणे यांनी आदित्य ठाकरे यांची तुलना थेट उंदराशी केली आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(narayan rane compared shivsena leader aditya thackeray to a mouse)

पुन्हा पक्षबांधणीसाठी आदित्या ठाकरे राज्यभरात निष्ठा यात्रा सह शिवसंवाद यात्रा करत आहे. शिवसैनिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून नारायण राणे यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने टीव टीव करत हा उंदीर महाराष्ट्रभर फिरत आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: च्या कर्तुत्वावर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. दसरा मेळावा जर झाला तर तो एकनाथ शिंदे घेतील. जर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी नक्की येईल, असे नारायण राणे म्हणाले.

बाळासाहेबांच्या नावाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. आता तुम्ही निवृत्त झाला आहात, त्यामुळे तुम्हाला आता बोलण्याचा अधिकार नाही, टीका करण्याचा अधिकार नाही. आता घरी बसा. स्वत: च्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्धा लायकी नाही, अशी टीकाही राणेंनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT