rane raut esakal
महाराष्ट्र बातम्या

"संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर टिका करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (shivsena sanjay raut) यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली आहे. काही लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून अमित शहा किमान काश्मीरला तरी जातात, संजय राऊत यांनी जाऊन तरी दाखवावे. यांचे राज्यात सरकार असून हे काय करत आहेत. तसेच आताचे राज्याचे उद्योगमंत्री जमिनी विकत आहेत, असा सणसणीत टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. मुख्यमंत्री यांनी कर्तव्य काय हे त्यांनी आधी समजून घ्यावी जबाबदार व्यक्तीने असे बोलू नये. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे. अडीच वर्षे झाली तरी यांना एबीसीडी कळलेली नाही. असा आरोप राणेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात भाजप नेत्यावर टीका

काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावला आहे. तसेच काश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी शिवसेनेनं हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असं काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरण देत म्हटलं आहे. तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT