narayan rane, sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

आग लावण्याचे काम कमी करून पक्षाकडे लक्ष द्या: राणेंचा राऊतांना सल्ला

दुसऱ्यावर टीका करून तुम्ही वाढणार नाही ; नारायण राणे

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : भाजपमध्ये कोण मोठ कोण छोटे याचं मूल्यमापन मी करणार नाही. पण संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत. पक्षाला गळती लागली आहे त्याकडे अधिक लक्ष द्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विधानाला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले. आज कोल्हापूरमध्ये ते बोलत होते. शिवसेना (Shivsena)काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळले होते. असे राऊत म्हणाले होते. यावर राणे यांनी निशाणा साधला आहे. (Narayan Rane Criticizes Sanjay Raut)

पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)यांचं त्यांच्या जन्मदिनी नाव घेतलं. कोण नेते मोठे आहेत कोण छोटे आहेत याचे मूल्यमापन मी बीजेपीचा असल्यामुळे करणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात बीजेपी (BJP)वाढवायला फार कष्ट घेतले. असेच कष्ट घेणारे अनेक नेते बीजेपीत आहेत. मात्र राऊत हे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांनी कमी करावे. आणि तुमच्या पक्षाला जी गळती लागली आहे, तळागाळापर्यंत पक्ष संपत चालला आहे तो सावरण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यावर टीका करून तुम्ही वाढणार नाही. अशी टीका राणेंनी केली.

पेपरफुटी संदर्भात बोलताना राणे म्हणाले, पेपर फुटी म्हणजे पैसे देऊन केलेला भ्रष्टाचार आहे. हे सरकार अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, विकासात्मक प्रश्न आहे तिथेच आहेत. विकास ठप्प झाला आहे. सरकारचा प्रमुखच जर कार्यरत नसेल तरी यंत्रणेवर कोणाचा अंकुश असेल. सरकार अस्तित्वात आहे का हाच मुळात प्रश्न आहे. हे राज्य दोन वर्षात किमान दहा वर्ष तरी मागे गेले आहे. म्हाडा पेपर फुटी वर केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत बँका आणि ठेवीदार सुरक्षित झाले आहेत. पंतप्रधानाने विमा सुरक्षा योजना सुरू केल्यापासून पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध झाला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

भाजप नेते गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याच्या राजकारण जे तुम्हांला दिसत आहे ते दिसले नसते. शिवसेना भाजपाची युती टिकावी यासाठी अखेर पर्यंत ते प्रयत्न करीत राहिले. आज भाजपात गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा ताेडीचा नेता नाही अशी खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले शिवसेना काय आहे हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळले होते. आम्ही त्यांच्याबराेबर २५ ते ३० वर्ष काम केले आहे. बहुजन समाजाच्या नेतृत्वची सुरुवात त्यांनीच केली असेही राऊत यांनी नमूद केले. दरम्यान महाराष्ट्राला आणि देशाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभत राहाे अशी भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT