महाराष्ट्र बातम्या

'नवाब मलिकांनी मंत्र्यांची चिंता करावी, उगाच डायलॉगबाजी करू नये'

भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्यााचा नैतिक अधिकार महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांना नाही.

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्यााचा नैतिक अधिकार महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांना नाही.

नवाब मलिक यांनी त्यांच्या मंत्र्यांची चिंता करावी उगाच डायलॉगबाजी करू नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. मलिक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे. आज मुंबई येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. यावेळी भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याला नाही. त्यामुळे जितके आरोप कराल त्यांची उत्तर त्याच दणक्यात मिळतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने सध्या सोडून दिले आहे. त्यांच्या जवायाचे काय काय उद्योग आहेत सर्वांना माहीत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या मंत्र्यांची चिंता करावी उगाच डायलॉगबाजी करू नये. मोदींमुळे यांचे 18 खासदार निवडून आले आहेत. पुढच्या वेळी 8 देखील निवडून येणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार कोणत्याही नेत्याला नसल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, सुशांत आणि दिशाच्या मर्डरमध्ये काही झाले नाही. आज ब्राऊन शुगर तर ओपन आहे. जर तुमची सत्ता आहे तर माल येतो कुठून? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यांचे लक्ष फक्त हात धुवून घेणे इतकेच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Dairy Kolhapur : गोकुळच्या पहिल्याच बैठकीत खुर्च्यांवरून शाब्दिक चकमक; बैठक व्यवस्थेवरून बाबासाहेब चौगले, अंबरीश घाटगे, चेतन नरकेही म्हणाले आम्ही ५ वर्षे बसलोय...

Who is Khilan Patel? वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टारचा पहिलाच ट्वेंटी-२० सामना... ८ Six, ६ Fours अन् ८४ धावांची वादळी खेळी

मंत्री असून प्राध्यापक बनले, पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप; नेता अडचणीत

Pune Crime: 28 लाखांची बॅग घेऊन कर्मचारी पसार; पुणे पोलिसांचा 10 हजार किमी पाठलाग, अखेर चौघे जाळ्यात

Latest Marathi News Live Update: मराठवाड्याच्या हक्काचं पाणी कधी मिळणार? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT