narayan rane sakal
महाराष्ट्र बातम्या

सात गुन्हे दाखल करा नाहीतर 70 हजार, मला फरक पडत नाही- राणे

सकाळ वृत्तसेवा

Narayan Rane Jan Ashirwad Yatra : मुंबई : यापूर्वी सभा, बैठका झाल्या नाहीत काय, हे मला माहित नाही का, मग आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का केली, सात गुन्हे दाखल करा की सत्तर की सत्तर हजार, मला काहीच फरक पडत नाही,असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. मुंबईत गुरुवारी विविध ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेत मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी सात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबद्दल राणे यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले.

राणे म्हणाले की, गुन्हे दाखल केल्यामुळे माझ्यावर काही फरक पडत नाही. सात गुन्हे दाखल करा, सत्तर करा नाहीतर ७० हजार. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत मी त्यांच्या पाठीशी आहे. ही यात्रा आम्ही जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आयोजित केली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे कार्यक्रम झाले तिथे नियमांचे उल्लंघन झाले नव्हते काय? त्यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, याकडेही राणे यांनी लक्ष वेधले. शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणाबद्दल विचारल्यानंतर राणे संतापले. ते म्हणाले की, मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळे स्थान आहे. कालपासून मी एवढ्या विषयांवर बोललोय पण मला पत्रकार देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र या एकाच विषयाबद्दल पत्रकार विचारत आहेत.

यापूर्वी विरोधकांच्या सभा, कशा झाल्या. कार्यक्रमांना किती गर्दी होती. तेव्हा गुन्हे दाखल झाले नाही. तुमच्या डोक्यावर कोणीतरी बसलेले आहे. आम्ही वर आहोत तुम्ही खाली आहात, हे ध्यानात ठेवा.

नारायण राणे, केंद्रीय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT