Narayan Rane Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

राणेंना पुन्हा नोटीस; "अनधिकृत बांधकाम काढा अन्यथा..."

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगर पालिकेने ही नोटीस पाठवली आहे.

सुधीर काकडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. जुहू येथील अधीश (Adhish Bungalow, Juhu) बंगल्याचं बांधकाम करताना राणे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगर पालिकेने ही नोटीस धाडली आहे. यापूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने राणेंच्या घरी जात पाहणी केली होती. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) थेट राणेंना १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम काढा अन्यथा कारवाई करु अशी नोटीस दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या 9 अधिकाऱ्यांचं पथक २१ फेब्रुवारी रोजी राणेंच्या अधीश बंगल्यामध्ये गेलं होतं. याठिकाणी त्यांनी कागदपत्रांची पडताळणी, बंगल्याची पाहणी करत, नारायण राणेंशी चर्चा केली होती. महापालिकेच्या पथकासह फोटोग्राफर्स देखील अधीश बंगल्यात गेले होते. अनधिकृत कामांचे पुरावे गोळा करण्याचं काम या फोटोग्राफर्सने केलं होतं.

दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर नारायण राणेंनी आपण कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT