Narayan Rane  esakal
महाराष्ट्र बातम्या

राजकीय समीकरणं बदलणार ; नारायण राणेंनी बोलावली तातडीची बैठक

नितेश राणे यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.

तुषार सावंत

कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Paeab)यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटकेची शक्यता असल्याने त्यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे या अर्जाची सुनावणी आज दुपारी होणार असून त्याची प्रतीक्षा राजकीय क्षेत्रांमध्ये आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग (Sindhdudurg) जिल्हा भाजप कार्यकारिणीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कणकवलीत प्रहार (Prahar) भवनामध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्हा बँक निवडणूक आणि पोलिस कारवाई याबाबत प्रामुख्याने चर्चा होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आमदार नितेश राणे यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. काही माध्यमानी नितेश राणे मुंबई टू गोवा (Mumbai,Goa)असे नारायण राणे सोबत आले होते अशी ही बातमी दिली आहे. मात्र, या बातमीला पोलिसांकडून अजूनही दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे नितेश राणे नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रमावस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT