Narayan Rane-Nitesh Rane in Disha Salian death Case esakal
महाराष्ट्र बातम्या

राणे पितापुत्रांना अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे. दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी आता राणे पितापुत्रांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Nitesh Rane tweeted on Disha Salian)

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कारण नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे. नितेश राणेना ३ मार्च तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. दिशा सालीयान मृत्यूसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे, दिशाच्या आईने मालवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. दिशा सालीयान सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूबाबता राणे पितापुत्रांनी केलेल्या वक्तव्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं. आज परत महापौरांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीची बदनामी करू नका, अशी विनंती केली. तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. यामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे या दोन्ही पिता-पुत्रांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT