Narayan Rane
Narayan Rane esakal
महाराष्ट्र

Narayan Rane: उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी सुपारी दिली; नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

सकाळ डिजिटल टीम

दसऱ्याच्या निमित्तानं शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण झाले. मात्र त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर संमिश्र पद्धतीनं उमटताना दिसत आहे. ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केलीय. राणे यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे. पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "म्हणले उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं" आणि मला मारण्यासाठी देखील उद्धव ठाकरे यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, परंतू मी त्यांना पुरून उरेलो.

मी आजही जिवंत आहे. मला कोणीही मारू शकलं नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे. 2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे असं देखील राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT