Narayan Rane 
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane: "शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय?" असा सवाल करत नारायण राणेंनी घेतली वादात उडी

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला शंकराचार्यांनी बहिष्कार टाकला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला चारही पीठांच्या शंकराचार्यांनी बहिष्कार टाकला आहे. हे चौघेही या सोहळ्याला हजेरी लावणार नाहीत असं त्यांनी स्वतःच जाहीर केलं आहे. यावरुन आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या सर्व शंकराचार्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांच हिंदु धर्मातील योगदान काय? असा सवालही केला आहे. (Narayan Rane remark on Shankaracharya statement he raised question that what is his contribution to Hinduism)

माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, "शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी. म्हणजे हे शंकराचार्य आमच्या भाजपला मोदी साहेबांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे सर्व राजकीयदृष्टीकोनातून नव्हे तर राम आमचा देव आणि दैवत आहे त्यासाठी हे सर्व केलं जात आहे, मंदिर तयार होत आहे. (Latest Marathi News)

रामाची मूर्ती तिथं जागेवर येतं आहे, आम्हाला त्याच्यापुढं नतमस्तक होता येत आहे याचं आम्हाला समाधान आहे. त्यामुळं शंकराचार्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांनी जीवनात हिंदु धर्मासाठी काय योगदान दिलं? हे त्यांनी सांगावं. जे योगदान हिंदु धर्मासाठी रामानं दिलं, ते त्यांनी दिलं आहे का?" (Marathi Tajya Batmya)

शंकराचार्य नेमकं काय म्हणाले?

पुरी येथील पीठाधीश्वर निश्चलनानंद सरस्वती यांनी शनिवारी राम मंदिर प्रतिष्ठापनेबाबत मोठं भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं, "श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणं गरजेचं आहे. पण शास्त्रांनुसार विधीचं पालन करुन ही प्राणप्रतिष्ठा पार पडली पाहिजे. त्यामुळं मूर्तीमध्ये देवाचा सहवास राहतो. विधीवत पुजाअर्चा झाली नाही तर यामध्ये अडचणी निर्माण होतात.

राजकीय नेत्यांनी आपल्या मर्यादा असते त्यांची जबाबदारी असते. संविधानाच्या कक्षेत धार्मिक, आध्यात्मिक विधींचं पालन केलं जावं. पण प्रत्येकक्ष क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा राजकीय लोकांची सवय असते. त्यांनी पुढं म्हटलं की, अयोध्येपासून मी नाराज नाही, अयोध्येला मी जात-येत असतो. पण २२ जानेवारीला मी अयोध्येला जाणार नाही"  (Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT