Pravin-Darekar-Warning 
महाराष्ट्र बातम्या

"शुद्धीकरण' कोत्या मनाने होतं नसतं! बाळासाहेब सर्वांचे आहेत"

विराज भागवत

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे स्पष्ट मत

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गुरूवारी शिवतीर्थावर (Shiv Tirtha) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb) यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. पण ते दर्शन घेऊन गेल्यानंतर काही शिवसैनिकांनी (Shivsena) त्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण (Purification) केल्याचा प्रकार घडला. राणे यांच्या येण्याने शिवतीर्थावर नकारात्मकता (Negativity) असल्याने तो परिसर शुद्ध केल्याचं शिवसैनिकांनी सांगितले. परंतु, या कृत्याचा भाजपकडून (BJP) निषेध करण्यात आला असून त्यांनी शिवसेनेला काँग्रेसवरून (Congress) टोलाही (Taunt) लगावला.

नक्की काय घडलं?

नारायण राणे यांनी गुरुवारी सकाळी बाळासाहेब ठाकरे याचं स्मृतीस्थळ असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात जाऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं. त्यानंतर राणे आपल्या जनआशीर्वाद यात्रेला गेले. नारायण राणे तिथून निघून गेले त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा फोटो असलेला चौथरा थेट गोमूत्र शिंपडून स्वच्छ केला आणि थेट दुग्धाभिषेक करुन त्याचं शुद्धीकरण केलं.

शुद्धीकरण हे कधीही कोत्या मनोवृत्तीने केलं जाऊ शकत नाही. मुख्य बाब म्हणजे, बाळासाहेब ठाकरे हे साऱ्यांसाठीच वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल साऱ्यांच्याच मनात आदर आहे. अशा वंदनीय व्यक्तिच्या स्मृतींना अभिवादन करून कामाचा शुभारंभ करणं ही एक सकारात्मक बाब असते. अशा वेळी शिवसैनिकांचे असे वर्तन योग्य नाही असे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. "शुद्धीकरण' हे कोत्या मनाने होतं नसतं! वंदनीय बाळासाहेब सर्वांचे आहेत! सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी, आधी काँग्रेसला विचारायला पाहिजे होतं की 'गोमूत्र' शिंपडलं तर चालणार आहे का?", असे ट्वीट त्यांनी केले.

राणे काय म्हणाले?

आजही बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. म्हणूनच मुंबई महापालिका जिंकणं ही माझी जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. केंद्रीय खात्याच्या मदतीने राज्यात अधिक रोजगार उपलब्धतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेला कोणावरही टीका करण्याचा अधिकार नाही. गेली ३२ वर्ष मुंबई महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांनी मुंबई बकाल केली. मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न यांनीच निर्माण केले, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT