narayan rane slams shivsena aaditya thackeray on shivsena melava esakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane: आदित्यही तुरुंगात जाणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणाला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणाला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात तुरुंगात जाणार, असा इशारा राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी दिला.(narayan rane slams shivsena aaditya thackeray on shivsena melava)

पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल. गिधाड वगैरे कुणाला उद्देशून बोलले आहात? ही वक्तव्य तुरुंगाचा रस्ता दाखवणारी आहेत.

तसेच, खोक्यांचा विषय तर आहेच. त्याची चौकशी होणार आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची सुटका झालेली नाही. सुशांत प्रकरणातूनही तुमच्या मुलाची सुटका झालेली नाही. आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही,” असा इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.

यासोबतच राणेंनी यावेळी बाप चोरीच्या मुद्यावरही भाष्य केले आहे. अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? बापाचं धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत. असही सुनावलं. बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढले, यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे विचार मातीत घातले. देशाच्या मोठ्या नेत्यांना गिधाडं म्हणाले, हा लबाड लांडगा आहे. अशा शब्दात टीकाही राणेंनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT