Narayan Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

अटकसत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू: नारायण राणेंचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही ;राणे

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये. भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्याचे न थांबल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल(ता.२६) पत्रकार परिषदेत दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायतच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांनी जी दडपशाही, हुकूमशाही चालविली आहे, त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही चालविली आहे. सुडाचे राजकारण सुरू केले आहे. या दडपशाहीला खतपाणी घालण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर अटकसत्र मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या प्रमाणात कोणतीही खातरजमा न करता अटकसत्र सुरू केले आहे. हे अटकसत्र त्यांनी तात्काळ थांबवावे. अन्यथा एसपी कार्यालयावर आम्हाला भव्य मोर्चा काढावा लागेल. जिल्हा बँक निवडणूक व चारही नगरपंचायतीवर भाजपा शंभर टक्के यश मिळविणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. त्यामुळे येथील मतदार शेतकरी जिल्हा बँकसह चारही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात देणार आहे. सत्ताधाऱ्यांची दडपशाही आम्ही निश्चितच मोडीत काढू. राज्यातील महाविकास आघाडी सर्व बाबतीत निष्क्रिय ठरली आहे. कोणतेही प्रश्न सोडवू शकलेली नाही. मुख्यमंत्री असून नसल्यासारखे आहे. कणकवलीमध्ये एका सज्जन कार्यकर्त्याला मारहाण झाली, या घटनेबाबत आमदार नितेश राणे, संदेश सावंत यांना पोलीस वारंवार बोलावून त्यांना अटकेसाठी सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून सुडाचे राजकारण करत आहेत.’’ यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राकेश कांदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापलं! राहुल गांधींनी सरकारला घेरलं; ठेवल्या तीन ठोस मागण्या, पण कोणत्या?

New Cricket Rules: मुद्दाम नो-बॉल टाकला, तर बॉलर मॅचमधून बाहेर! BCCI लागू करणार असलेल्या नव्या नियमांबद्दल घ्या जाणून

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Japanese Eating Habit: २० टक्के पोट रिकामे ठेवून दीर्घायुष्य? काय आहे जपानची 'हारा हाची बू' पद्धत ?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

SCROLL FOR NEXT