Ajit Pawar, Narau=yan Rane Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sindhudurg : 3 पक्ष एकत्र असताना पराभूत झाले, याला अक्कल म्हणतात

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री नाही, राज्याची वाटचाल अधोगतीकडे ; नारायण राणे

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग: सगळ्यांना पुरुन उरलो, आणि केंद्रापर्यत पोहचलो आतापर्यत थांबलो नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर भाजपचा विजय झाला. ३ पक्ष एकत्र असताना पराभूत झाले, याला अक्कल म्हणतात असा टोला अजित पवारांना (Ajit Pawar)केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election)भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) निवासस्थानी दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) सडकून टीका केली.

सगळ्यांना पुरुन उरलो, आणि केंद्रापर्यत पोहचलो आतापर्यत थांबलो नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर भाजपचा विजय झाला.

पुढे ते म्हणाले, अकलेचा वापर झाला म्हणून जिंकलो. हा भाजपचा (BJP) मोठा विजय आहे. राज्याला भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे. 'लगाम'ची टिम नको. महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री नाही, राज्याची वाटचाल अधोगतीकडे चाललीय.अर्थमंत्री येतात आणि पराभव करून जातात. आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे असं विधान नारायण राणें यांनी केलं. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ताब्यात मिळावी यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चढाओढ होती. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनवरून बॅंक निवडणूकीला वेगळे वळण लागले होते. मात्र आज भाजपची एकहाती सत्ता आल्याने राणे यांचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी काल मतदान तर आज ३१ मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला ११ आणि महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. भाजपने जिल्हा बँकेवर एक हाती सत्ता काबीज केली आहे. तर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष ,यांच्यासह तब्बल दहा संचालकांना पराभव पत्करावा लागला.

काय म्हणाले होते अजित पवार

सहकारात पक्षीय राजकारण येवू देवू नका, तर चांगल्या लोकांच्या हातात जिल्हा बँक देवून मागच्या लोकांनी घालून दिलेला आदर्श कायम ठेवा. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. कोकणी माणूस हा विचार करुन मतदान करतो हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती या निवडणूकीत करून चुकीच्या लोकांना बँकेपासून बाजूला ठेवा असेही आवाहन त्यांनी शरद कृषी भवन येथे आयोजित जिल्हा बँक निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडी मेळाव्यात बोलताना केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT