Narayan Rane sakal media
महाराष्ट्र बातम्या

राणे बंधूंविरोधात FIR; नारायण राणे म्हणाले, "टीकेचे खंडन करणे हे.."

सकाळ डिजिटल टीम

राणे बंधुंच्या अडचणी सध्या संपताना दिसत नाहीयेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपूत्र हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्याविरोधात नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे या दोघांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रीया दिलीय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनता किंवा विरोधकांची टिका खोडून काढणे हे सत्तारुढ पक्षाचे कर्तव्य असून विरोधकांच्या टिकेचे खंडन करण्याएवजी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्विट करत व्हेरा समितीचा निकाल राज्य सरकारने मागवावा अशी मागणी केली आहे, त्यामध्ये कोणाचे दाऊदशी संबंध आहेत ते देखील समोर येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी ट्विट करत "जनता किंवा विरोधक यांच्या टीकेचे खंडन करणे हे सत्तारूढ पक्षाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्यांच्या विरोधात FIR दाखल करणे, याला सत्तेचा दुरुपयोग म्हणतात. केंद्र सरकारच्या व्होरा समितीचा निकाल राज्य सरकारने मागवावा. त्यात कळेल कोणाचे दाऊदशी संबंध आहेत." असे म्हटले आहे.

तर गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रीया व्यक्त करत, "कितीही माझ्यावर केसेस घातले तरी मी म्हणतच राहणार, मला संशय आहे आणि राहणारच की पवार साहेब दाऊदची व्यक्ती आहे." असे ट्विट केले आहे.

दरम्यान निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीपूर्वक हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून दंगल घडेल असं वक्तव्य केलं. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचं वक्तव्य करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला असे त्यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT