PM Modi Devendra Fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

ज्यांचे कोणीही नाहीत, त्यांचे नरेंद्र मोदी आहेत : देवेंद्र फडणवीस

'मोदींचा एकच अजेंडा आहे, गरिबांचे कल्याण झाले पाहिजे.'

गणेश पिटेकर

औरंगाबाद : मोदींचा एकच अजेंडा आहे, गरिबांचे कल्याण झाले पाहिजे. गरिबांना गॅस सिलिंडर, वीज मोफत देण्याच्या योजना मोदींनी सुरु केल्या, असे कौतुक उद्गार विधानसभेचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील ग्रामीण संगोष्टी कार्यक्रमात आज सोमवारी (ता.२१) ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की रस्ता, बांधकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील मजूरांना संघटित क्षेत्रात आणून त्यांचे कल्याण करण्याचे काम मोदीजींनी केले. विकलांग यांना अपंग म्हणण्याऐवजी त्यांना दिव्यांग म्हटलं पाहिजे, असे नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितले. ज्यांचे कोणीही नाहीत. त्यांचे मोदी आहेत, असे फडणवीस म्हणाले. (Narendra Modi Is For Everyone, Said Devendra Fadnavis)

सरकारला शेतकऱ्यांचे देणे-घेण नाही, असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. रोज बडबड करायचे. पण शेतकरी, कामगारांच्या दुःखांबाबत सरकारच्या प्रवक्त्याने बोललेले पाहिले का?, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. चोवीस तास मोदी गरिबांचा विचार करतात. एक सेवक म्हणून सर्वसामान्यांना योजना पोहोचविण्याचे काम प्रशांत बंब करित आहेत. सत्तेत असो कि नसो मात्र जनतेची सेवा सतत करत राहू, या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपचे धोरण स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT