Ad. Rohini Khadse sakal
महाराष्ट्र बातम्या

Narendra Modi oath taking ceremony : राष्ट्रवादीला मंत्रिपद नसल्याने रोहिणी खडसेंचे भाजपवर आरोप; म्हणाल्या, अजितदादांना...

दुसरीकडे भाजपने रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. रोहिणी खडसे यांनी मात्र अजित पवार गटाला संधी न मिळाल्याने भाजपवर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, ज्या दिवसापासून अजितदादा भाजपबरोबर गेले आहेत, त्या दिवसापासून त्यांचा अपमान करण्याचा प्रकार सुरु आहे.

संतोष कानडे

Narendra Modi Shapathvidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाचं नवीन मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. यावेळी भाजपने घटकपक्षांना सन्मानाचं स्थान दिल्याचं दिसंय. मोदींच्या परवाच्या भाषणातही सातत्याने एनडीएचा उल्लेख होत होता.

महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला चार आणि एक मंत्रिपद शिंदे गटाच्या वाट्याला आणि दुसरं मंत्रिपद रामदास आठवले यांच्या वाट्याला येणार आहे. भाजपने भागवत कराड आणि नारायण राणे यांना मंत्रिपदापासून डावललं आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकही मंत्रिपद देण्याची शक्यता नाही. पक्षाचा एकच खासदार निवडून आल्याने कदाचित भाजपने त्यांना डावललं आहे. दोन दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर सुनील तटकरे यांचंही नाव पुढे येत होतं. मात्र अद्यापतरी अजित पवारांच्या वाट्याला मंत्रिपद येण्याची शक्यता नाही.

दुसरीकडे भाजपने रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. रोहिणी खडसे यांनी मात्र अजित पवार गटाला संधी न मिळाल्याने भाजपवर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, ज्या दिवसापासून अजितदादा भाजपबरोबर गेले आहेत, त्या दिवसापासून त्यांचा अपमान करण्याचा प्रकार सुरु आहे.

''आताही त्यांना डावलून भाजपने त्यांचा अपमान केला आहे. प्रफुल्लभाईंना डावल्याचा प्रकार सुरु आहे. यातून भाजपला वेगळा संदेश द्यायचा आहे. कदाचित भाजपला यांची उपयुक्तता संपल्याचं दिसून येत आहे.'' अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील फोन आलेल्या नावांची चर्चा

नितीन गडकरी

पीयूष गोयल

रक्षा खडसे

प्रतापराव जाधव

रामदास आठवले

मुरलीधर मोहोळ

आतापर्यंत शपथविधीसाठी निरोप आलेले खासदार-

अमित शाह

राजनाथ सिंह

नितिन गडकरी

एस जयशंकर

पीयूष गोयल

प्रल्हाद जोशी

जयंत चौधरी

जीतनराम मांझी

रामनाथ ठाकुर

चिराग पासवान

एच डी कुमारस्वामी

ज्योतिरादित्य सिंधिया

अर्जुन राम मेघवाल

प्रताप राव जाधव

रक्षा खड़से

जितेंद्र सिंह

रामदास अठवले

किरेन रिजुजु

राव इंद्रजीत सिंह

शांतनु ठाकुर

मनसुख मांडविया

अश्विनी वैष्णव

बंडी संजय

जी किशन रेड्डी

हरदीप सिंह पुरी

बी एल वर्मा

शिवराज सिंह चौहान

शोभा करंदलाजे

रवनीत सिंह बिट्टू

सर्वानंद सोनोवाल

अन्नपूर्णा देवी

जितिन प्रसाद

मनोहर लाल खट्टर

हर्ष मल्होत्रा

नित्यानंद राय

अनुप्रिया पटेल

अजय टमटा

धर्मेंद्र प्रधान

निर्मला सीतारामन

सावित्री ठाकुर

राम मोहन नायडू किंजरापु

चंद्रशेखर पेम्मासानी

मुरलीधर मोहल

कृष्णपाल गुर्जर

गिरिराज सिंह

गजेंद्र सिंह शेखावत

श्रीपद नायक

सी आर पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT