PM Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi : ''१६ देशांमध्ये ४० लाख तरुणांना नोकरी...'' मोदींनी सांगितली कौशल्य विकासामागची भूमिका

संतोष कानडे

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मोदींनी ऑनलाईन पद्धतीने या केंद्रांचं उद्घाटन केलं. राज्यातल्या ५११ ग्रामपंचायतींमध्ये या कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगामध्ये तरुणांचा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. त्यामुळे भविष्यात भारतीय तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, १६ देशांमध्ये ४० लाख युवकांना नोकरी मिळू शकते. त्यासाठीत हे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र काम करणार आहे. यामध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टर, आरोग्य क्षेत्र, ट्रान्सपोर्टेशन क्षेत्र यासह अनेक क्षेत्रांमध्ये परदेशात रोजगाराच्या संधी आहेत.

तसेच महाराष्ट्रात मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, या कौशल्य केंद्रातून तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार असून केंद्रातून सॉफ्ट स्किलवरही फोकस करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला केलं.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

सुख आणि यशाची प्राप्ती शिक्षण आणि कौशल्य यातून मिळते. आज महाराष्ट्रातील युवांसाठी आजची प्रभात ही मंगलप्रभात होत चालली आहे. अनेक देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असल्याने प्रशिक्षणार्थी युवा खूप कमी सापडतात. परदेशात 40 लाख प्रशिक्षित युवकांना नोकरी द्यायची आहे. भारतात युवकांना या सगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचं काम आपण करत आहोत, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT