Dada Bhuse esakal
महाराष्ट्र बातम्या

Nashik Dada Bhuse : आदिवासींच्या विकासाचा अनुशेष भरणार; दादा भुसे

दादा भुसेंची ग्वाही; सुरगाणा तालुक्यातील गावांचा गुजरातेत जाण्यावर पूर्णविराम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतानाही गुजरातच्या सीमावर्ती सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या विकास कामांची अपेक्षित पूर्तता न झाल्याने सीमा संघर्ष समितीने गुजरातमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरत थेट गुजरातेत वासदा तहसीलदारांना निवेदन दिले. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बांधवांच्या प्रश्‍नांच्या निराकारणासाठी प्राधान्यक्रम ठरवत विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कृती आराखडा केला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी हात जोडून टोकाची भूमिका घेऊ नका, अशी विनंती करत महाराष्ट्राची प्रतिष्ठा राखण्याची आग्रही भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली.

विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करत असताना उपलब्ध निधीच्या माध्यमातून प्रश्‍न मार्गी लावण्याची तयारी दर्शवत त्यांनी सुरगाण्यात अधिकारी-कर्मचारी राहणार नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. आदिवासींचे प्रश्‍न लवकर सुटावेत म्हणून प्रयत्न करण्याचा शब्द देत भुसे यांनी त्यासाठी स्वतः नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली. अखेर सीमा संघर्ष समितीने आमचे महाराष्ट्रावर प्रेम असून महाराष्ट्रासोबत राहू असे सांगत गुजरातमधील सहभागाच्या आपल्या आग्रहाला पूर्णविराम दिला. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

दादा भुसे म्हणाले...

  • उंबरठाणचे ग्रामीण रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना भेटणार

  • स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सिंचन व्यवस्थेला प्राधान्य देणार

  • रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरु होतील. १० लघु पाटबंधारे योजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार

  • सुरगाण्यात खास सवलत देऊन उद्योग यावेत म्हणून उद्योगमंत्र्यांना भेटणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT