Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 2024मध्ये आमदार श्रीकांत हे निवडणूक इन्चार्ज; भाजकडून विजयाचा महासंकल्प

संतोष कानडे

नाशिकः भाजपने 'महाविजय २०२४' हा संकल्प केला आहे. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. नाशिकमध्ये समर्पण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी लोकसभेसाठी ४५ जागा आणि विधानसभेसाठी २०० जागांचं मिशन आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांसाठी एकजुटीने कामाला लागलं पाहिजे.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे निवडणुकीची जबाबादारी देण्यात आलेली असून ते निवडणूक इन्चार्ज असतील. मला काय मिळणार, याचा विचार न करता पक्षकार्य कराव असं आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे...

  • 'महाविजय २०२४' हा भाजपचा नवा संकल्प आहे

  • लोकसभेसाठी मिशन- ४५, विधानसभेसाठी मिशन- २००; भाजप कार्यकारिणीमध्ये निर्णय

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही ट्वेंटी-२० ची बॅटिंग सुरु केली आहे

  • भाजपने शत-प्रतिशत भाजपचा नारा याच भूमीमध्ये दिला होता

  • महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा आपणच आहोत, हे आता सिद्ध झालं आहे

'हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं'

  • आमदार श्रीकांत भारतीय हे निवडणूक इन्चार्ज, बावनकुळे-फडणवीस यांची घोषणा

  • मला काय मिळणार, याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा करावी

  • हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते

  • हे सरकार बेकायदेशीर सरकार असं म्हणणारांनाच कायदा कळतो काय?

  • जे उरले-सुरले १०-१५ आहेत, तेही जातील म्हणून विरोधक घाबरले आहेत

  • सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हा मला पूर्ण विश्वास आहे

  • मला जेलमध्ये टाकण्याचा यांचा प्लान होता. परंतु मी यांच्या बापाला घाबरत नाही.

  • मी त्यांना पुरुन उरलो. मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, ते जेलमध्ये गेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT