Nashik District Dombivli Bhau Chaudhary expelled from uddhav thackeray Shiv Sena politics sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख डोंबिवलीतील रहिवासी भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी

संजय राऊत यांच्या ट्विटने खळबळ

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख तथा डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची बुधवारी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊंची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. हे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भाऊ चौधरी हे शिवसेनेतील संजय राऊत यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. शिवसेना कार्यकर्ता, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, शहरप्रमुख, परिवहन सभापती आशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आहेत. राऊत यांच्या आशीर्वादाने भाऊ चौधरी यांनी शहरप्रमुख, पालिका निवडणुकीतील उमेदवारी ते नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदापर्यंत मजल मारली होती. नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांचा ओढा नाशिककडे जास्त होता.

भाऊ हे व्यावसायिक असून गॅस पुरवठा ते करतात, डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसी मध्ये तुणची कंपनी आहे. करोना महासाथीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे म्हणून स्थापन समितीत भाऊ चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता. तत्कालीन नगरविकास मंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने जिल्ह्याला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या कामात भाऊंनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. करोना काळात नाशिकमधील शेतकऱ्यांची औषध फवारणी यंत्र कल्याण, डोंबिवलीत आणून शहर स्वच्छतेत त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. स्वच्छतेचा नाशिक पॅटर्न म्हणून हा उपक्रम प्रसिध्द झाला होता.

राऊत हे भाऊंच्या पाठीशी असल्याने तसेच थेट मातोश्रीशी ओळख असल्याने भाऊ यांना कोणी विरोध करत नव्हते. रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी शिवसेनेविषयी काही वाद्ग्रस्त वक्तव्य केले होेते. त्यावेळी दानवे यांचा निषेध करण्यासाठी भाऊ चौधरी यांनी दानवे यांच्या प्रतिमेची गा‌ढवावरुन धिंड काढली होती. त्याचा राग आल्याने भाजपचे माजी नगरसेवक आणि आता शिंदे गटातील महेश पाटील यांनी भाऊ चौधरी यांना त्यांच्या गोग्रासवाडीतील घराजवळ गाठून भाऊंच्या तोंडाला काळे फासले होते.

यावेळी प्रतिकार करण्याऐवजी काळे फासताना भाऊ चौधरी हसत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाले होते. त्याचीच चर्चा सर्वत्र त्यावेळी सुरू होती. या प्रकाराविषयी शिवसेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील निवडणुकीत ते पालिकेत नगरसेवक पदाचे उमेदवार होते. दांडगा जनसंपर्क नसल्याने ते पराभूत झाले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे - शिंदे गटाकडून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेवर दावा ठोकण्यासाठी दोन्ही गट आक्रमक दिसुन आले. यावेळी भाऊ पुढे नव्हते. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नसे. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी त्याचे फारसे पटत नसल्याने नाशिक येथेच ते जास्त सक्रिय दिसत असत.

शिवसेनेत फूट पडुनही भाऊंनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. याचा राग शिंदे गटाला होता. त्यामुळे शिंदे गटाकडून भाऊंची कोंडी सुरू असून भाऊ हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

याची कुणकुण लागल्यानेच उध्दव ठाकरे यांनी भाऊंची हकालपट्टी केली असल्याचे बोलले जात आहे. भाऊंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. भाऊ तिकडे गेल्यामुळे आम्हाला काही फरक डोंबिवलीत पडणार नाही असे शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: ठाकरे बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट : अमृता फडणवीस

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT