Nashik Graduate Constituency Election 5 reasons for Satyajit Tambe win  esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe: चौफेर घेरल्या गेलेल्या सत्यजित तांबेंनी विजय कसा खेचून आणला, जाणून घ्या पंचसूत्री

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय

रोहित हरिप

गेल्या महिनाभरापासून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले ते नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींकडे. काँग्रेसचे मोठे आणि महाराष्ट्रातले जुने नेते बाळासाहेब थोरात यांचे सख्खे भाचे सत्यजित तांबे यांनी वडलांना उमेदवारी मिळत असतानादेखील अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि ही निवडणूक एकदम हाय होल्टेज झाली. (Nashik Graduate Constituency Election 5 reasons for Satyajit Tambe win )

काँग्रेसचा महाराष्ट्रभर झालेली नामुष्की, ऐनवेळी शिवसेनेने शुभांगी पाटील यांना उमेदवारी देऊन मदतीचा देऊ केलेला हात, बाळासाहेब थोरात यांचे भाच्यासाठी असलेले सूचक मौन, थोरात-तांबे कुटुंबियांचे परंपरागत राजकीय वैरी असलेले विखे पाटलांनी तांबेंना दिलेले भाजप प्रवेशाचे आमंत्रण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा परिपाक या निमित्ताने समोर आला.

शेवटी निवडणूक पार पडली आणि सत्यजित तांबे यांनी विजय खेचून आणला. लवकरच ते त्यांची राजकीय भूमिका जाहीर करतील पण मविआला पुरुन उरुन तांबेनी हा विजय कसा मिळवला याचेच विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत.

सत्यजित तांबे हा काँग्रेसचा युवा आणि सुशिक्षित चेहरा. काँग्रेसमधले वजनदार मानले गेलेले हे घराणे पदवीधर निवडणुकीत केलेल्या बंडखोरीमुळे एकटे पडल्याचे चित्र होते. तरीही याआधी केलेल्या कामांच्या जीवावर तांबेंनी हा विजय सहज मिळवला. हा विजय तांबे मिळवू शकले याचं पहिलं कारण...

सुधीर तांबेंचा जनसंपर्क

सुधीर तांबे हे बाळासाहेब थोरातांचे सख्खे मेहुणे. गेली पंधरा वर्ष सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे एकहाती नेतृत्व करत होते. पंधरा वर्षात हा मतदारसंघ सुधीर तांबेंनी पिंजून काढला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघात ५ जिल्हे येतात. लाखो मतदार आहेत. य़ा मतदारांना तांबेंनी घट्ट बांधून ठेवलं होते. त्याचा थेट फायदा चौथ्या वेळेस सत्यजित तांबे यांना झाला. त्याशिवाय इथल्या छोट्या मोठ्या संघटना, शिक्षण संस्था यांनी सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतरही त्यांना साथ दिली त्यामुळे तांबेंचा विजय सोपा झाला.

सत्यजित तांबेंता करिष्मा

सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातले युवा नेते असले तरी गेली २० वर्ष ते कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर काम करत आहे. संघटनात्मक पातळीवर काम करताना सतत येणारा कार्यकर्त्यांशी संबंध आणि दांडगा जनसंपर्क यांचा नक्कीच फायदा सत्यजित तांबेना झाला.

नगर जिल्हात बाळासाहेब थोरात यांचे सहकार क्षेत्रात असलेले भरीव योगदान, सहकारी संस्थांचे जाळे, त्यातून उभे राहिलेल्या शिक्षण संस्था, कार्यकर्ते यांचीही साथ सत्यजित तांबेंना मिळाल्याचे चित्र आता स्पष्ट होतंय.

काही दिवसांपुर्वीच फडणवीसांनी सत्यजित तांबेंना जास्त काळ विधानसभेबाहेर ठेवू नका असे जाहीर विधान थोरातांच्या पुढ्यातच केलं होतं आणि अवघ्या काही महिन्यात आता सत्यजित तांबे हे विधीमंडळात दिसतील.

भाजपचा छुपा पाठिंबा

फडणवीसांच्या विधानाचा दाखला देण्याचे कारण म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघात पुर्ण वेळ भाजपची भूमिका ही संदिग्ध होती. या निवडणुकीत खरं तर शुभांगी पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती पण भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांना मविआ पुरस्कृत उमेदवार केलं.

दुसरीकडे भाजपने तांबे यांना कधीच जाहीर पाठिंबा दिला नाही पण स्थानिक पातळीवर मात्र तांबेंना मतदान करण्याचे सूचक आवाहन केलं. शिंदें गटाची जी काही ताकद या मतदारसंघात आहे ती देखील ऐनवेळी तांबेंच्या पाठीशी उभी राहिल्याने तांबेंचा विजय सोपा झाला.

शेवटचा पण महत्वाचा म्हणजे विखे पाटील फँक्टर. थोरात आणि विखे घराण्याचे राजकीय वैर हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोघांचे मतदारसंघ हे एकमेकांना लागून असले तरी विखे थोरातांचे मात्र कायम विळ्या भोपळ्याचे सख्य राहिले आहे. यावेळेस मात्र विखे पितापुत्रांनी सत्यजित तांबेंच्या उमेदवारीला मदत केल्याचेच चित्र आहे.

नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा देताना स्थानिक उमेदवाराला पाठिंब्याचे कारण दिले आहे. विखेंचीदेखील नगर उत्तर जिल्हात आणि नाशिक जिल्हात चांगली ताकद आहे आणि ती ताकद विखेंनी तांबेंच्या पाठिशी उभी केल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच तांबेंना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT