Nashik Graduate Constituency Election Satyajeet Tambe first reaction after win esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe: विजयानंतर सत्यजित तांबे घेणार मोठा निर्णय, म्हणाले...

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर लवकरच मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन अशी पहिली प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आलं आहे. झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभारलेले सत्यजीत भाजपमध्ये प्रवेश करणार का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. (Nashik Graduate Constituency Election Satyajeet Tambe first reaction after win)

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची बनली होती. या निवडणुकीत ६८ हजार ९९९ मतं मिळवत सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे.

विजयानंतर तांबे काय म्हणाले?

जनतेचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली. डॉ सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे.

आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मताधिक्य कमी झाले. मतदान यादीतील घोळ आणि सोमवारचा दिवस असल्याने मतं अपेक्षेपेक्षा कमी पडली. लवकरच मी राजकीय भूमिक स्पष्ट करेन, असं सूचक वक्तव्यही तांबे यांनी केलं आहे.

भाजपमध्ये करणार प्रवेश?

सत्यजित यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ‘ अशा चांगल्या माणसांना मोकळे ठेवू नका, नाहीतर आमचा डोळा राहतो. चांगले नेते भाजपला हवेच आहेत, ‘ अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेने जोर धरला.

इतकेच काय तर निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT