Nashik graduate constituency elections  esakal
महाराष्ट्र बातम्या

कोण मारणार बाजी! नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान

नाशिक विभागात जवळपास २ लाख ६२ हजार ७३१ मतदार

रुपेश नामदास

Nashik graduate constituency  elections : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान आज पार पडणार आहे. या निवडणूकीत चुरशीची होणार हे ठरलेलच आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे काँग्रेसचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ही मतदारांशी गाठी भेठी घेवून चांगला जनसंपर्क मतदार संघात वाढवल्याचे पाहिला मिळत आहे.

पदवीधर निवडणूकीसाठी नाशिक विभागात जवळपास २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. मात्र काही पदवीधरांची नावेच मतदार यादीत नसल्याचे धांदल उडाली आहे. तर काही पदवीधरांनी नाव नोंदणी न केल्याने त्यांना पदवीधरसाठी मतदान करता येणार नाही.

दरम्यान सत्यजीत तांबे यांना भाजपने आधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही मात्र. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी काल माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली होती.

भाजप स्थानिक कार्यकर्त्यांनी तांबे यांचे स्टेटस ठेवले होते. मात्र हा निर्णय पक्षाचा नाही. असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल.

नाशिक पदवीधर विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात मतदान पार पडणार आहे. नाशिक विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदाना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७ मतदान केंद्र तर नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT