sujay vikhe on Satyajeet Tambe esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : फडणवीसांनी फक्त सांगावं, चार तासांत उमेदवार निवडून आणू; विखेंचं विधान चर्चेत

संतोष कानडे

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे रिंगणात आहेत. तांबेंना भाजपची मदत मिळेल, अशी शक्यता असतांना खासदार सुजय विखे यांचं एक विधान राज्यात चर्चेत आलेलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसने डावलून त्यांचे वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला. मात्र सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचाः ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

काँग्रेस पक्षाने पिता-पुत्रावर कारवाई केली आहे. या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे यांना भाजपची रसद मिळणार, असं सांगितलं जात असतांना नगरचे खासदार सुजय विखे यांचं एक विधान चर्चेत आलेलं आहे. सुजय विखे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर आम्ही चार तासात एखाद्या उमेदवाराला निवडून आणू असं ते म्हणाले. खासदार सुजय विखे हे आज अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले विखे?

'नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांची एवढी ताकद आहे की, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १२ वाजता जरी सांगितलं तरी आम्ही एखादा उमेदवार निवडून आणू शकतो. फक्त चार तासांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची आमच्यात ताकद आहे. ३० तारखेला मतदान आहे. आम्हाला २९ च्या रात्री १२ वाजता जरी सांगितलं तरी उमेदवार निवडून आणू शकतो.' असं विखे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आंदोलक विद्यार्थ्यांशी वागताना संयम आणि सावधगिरी बाळगायला हवी, सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT