Nashik Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: महाराष्ट्र हादरला! आश्रमात सहा अल्पवयीन मुलींवर संचालकाडूनच अत्याचार

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः एका आश्रम संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वीच या प्रकरणी एका पीडितेने तक्रार दिली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आणखी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे.

नाशिक येथील म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात हा प्रकार घडला आहे. या आश्रमाचा संचालक हर्षल मोरे याने हे घृणास्पद कृत्य केलेय. त्याच्यावर म्हसरुळ पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थीनेने हर्षल मोरेविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर मोरेला पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी आश्रमातील इतर विद्यार्थीनींचे जबाब नोंदवले. आणखी पाच अल्पवयीन मुलींसोबत असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना १५ मुलींचे जबाब नोंदवले होते. पीडित सहा मुलींपैकी पाच अल्पवयीन आहेत. या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

पोलिसांना हर्षल मोरेला न्यायालयासमोर सादर केले. कोर्टाने बुधवारपर्यंत या संशयित आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि बलात्कारासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT